शब्दांचे हात,
हार शब्दांचेच गुंफती,
शब्दांचे पाय,
सुरा-तालावर नाचती,
शब्दांचे चांदणे,
चातकही शब्दवेडे,
शब्दांचा परिमळ,
वाहती शब्द चोहीकडे!!
---
शब्दांना नाही, स्थळा-काळाचे वावडे,
स्फुरती केव्हाही झर-झरा,
लिहीता, तारांबळ उडे!
---
शब्दांची घेऊन दिंडी,
नाचती शब्दवेडे वारकरी,
अक्षरबह्मानंदी लागे टाळी,
मोक्ष, साहित्य-पंढरी!!!
आकांक्षा फडके
No comments:
Post a Comment