पौगंडावस्था आणि तारुण्य ही खरंतर जादूई वेळ.. पण बऱ्याच पालकांना आणि मुलांना ह्या काळात काही ताणाला सामोरे जावे लागते.
ह्या वयातील मुलांना भेटणं ही माझ्यासाठी एक ट्रीट असते आणि त्यांच्या स्वप्नातल्या गावी माझेही मन थोडावेळ रेंगाळते. कोणे एके काळी आपणही होतो बरे ह्या स्टेशनवर असे आठवून मनाला मी खुणावते आणि पुन्हा कामाला लागते. ह्या तरुणांचे पालक काळजीत व्यग्र असतात आणि त्यांच्या आणि मुलांमधला ब्रीज होण्याचे काम एक समुपदेशक म्हणून मला करायचे असते.
पौगंडावस्थेचे आपण ढोबळ मानाने दोन टप्पे पाडतो. साधारण 13-18हा वयोगट डोळ्यासमोर ठेवला तर लक्षात तर लक्षात येते की ह्या टिन एज मध्ये खूप स्थित्यंतरे घडत असतात आणि त्याचे सर्वात जवळचे साक्षीदार असतात पालक आणि शिक्षक! ह्या वयात शारीरिक,बौद्धीक,भावनिक आणि मानसिक अशा सर्व अवस्थांमध्ये बदल होत असतात.
मुलींमध्ये शरीराची गोलाई वाढणे स्तनांची वाढ होणे,पाळी सुरू होणे तसेच मुलांमध्ये वजन उंची वाढणे, आवाजात बादल होणे,काखेत जांघेत केस येणे ते अगदी झोपेत विर्य पतन होणे इथवर बदल संभवतात.
ह्याच काळात स्व संकल्पना बदलायला सुरवात होते. शरीरातील बदलांना स्वीकारून स्वतः बद्दलची नवी ओळख ही मंडळी स्वतः ला करून देऊ बघत असतात.
प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ Erikson यांच्या मते शालेय शिक्षणाचे टप्पे यशस्वीपणे पार पाडलेले मूल साधारणपणे योग्य बदल दाखवत असते. या टप्यावर अपयश आल्यास inferiority तयार होऊ शकते. 13-18हा कालावधी स्वतंत्र विचार करायला भाग पाडतो आणि या काळात घेतले गेले व्यावसायिक निर्णय हे आधीच्या काळातील
यशापयशाच्या संकल्पनेवर आणि स्वसंकल्पनेवर आधारित असू शकतात हा टप्पा मूल जेव्हढा ठामपणे ओलांडले तेव्हढे ताण कमी !
Piaget च्या माते या काळात हळूहळू त्याला प्रत्येकजण स्वतंत्र विचार करत असतो याची जाणीव होते आणि हळूहळू या वयातील मुलं तार्किक विचार करू शकतात आणि आपला मुद्दा ठामपणे मांडयाला लागतात.तेव्हा या काळातील मुलांच्या बौद्धीक वाढीकडे त्यांच्या तार्किक बुद्धीचा आणि संपूर्ण वाढीचा जवळचा संबंध असतो.
Kohlberg च्या मते पौगंडावस्थैमध्ये मूल कसे आणि काय वागते याही पेक्षा ते का वागते विशिष्ट निर्णय ते घेते हे अभ्यासणे महत्त्वाचे. आठ अवस्था मधून जाताना मुलं स्वतः ची मते, समाज ,मैत्रीला जगण्यासाठी केलेल्या गोष्टी, बक्षीस-शिक्षेकडे बघण्याचा दृष्टीकोन, स्वतः च्या स्वीकारासाठी चालू असलेली धडपड ,हक्क, सामाजिक बंधन आणि मग तर्क या माध्यमातून विचार करते. ज्या समाजाच्या संपर्कात मूल येते त्यावरून त्याची चांगली वाईट वाढ ठरते. या सगळ्याला डोळ्यासमोर ठेवले तर कळते या वयातील मुले अचानक आपल्यापासून सुटी होऊ लागतात,मित्रमंडळीत रमणे त्यांना अधिक आवडू लागते,बिनधास्तपणा आपली मते मांडणे,प्रसंगी वाद घालणे स्वतः च्या विश्वात रमणे ती पसंत करू लागतात त्यामागे कारणे आहेत. त्यांना पालकांना दुखवायचे नसते पण बरेचदा ती भांबावलेली असतात. मलाही मत आहे आणि मी स्वतंत्र विचार करू शकतो हे त्यांना माहीत असते. पालक कितीही modern असले तरी प्रत्येक पाल्याला ते कधींनाकधी मागासलेले हे वाटतातच. मग घराघरात युद्ध चालू होतात. पालकही प्रथमच ह्यातून जात असतात तेव्हा ही तारांबळ उडणे स्वाभाविकच असते.
यातून मार्ग काढायला जेव्हा ते माझ्याकडे येतात तेव्हा मी पाहिले हेच सांगते की ते एका universal स्थिती मधूनच जात आहेत ..ह्यात भयंकर असे जगावेगळे असे काहीच नाही
ओढाताण होते आहे त्रास होतो आहे परंतू प्रेम आहे तिथे सगळे शक्य आहे. This is a stage of a transition. मुले काही आपल्यापासून कायमची तुटत नाहीत आणि आईबाप काही कायमचे व्हिलन ठरत नाहीत हे लक्षात घेणे फार महत्वाचे! थोडे सबुरीने घेता आले आणि टिम वर्क केलं की सगळे सुरळीत होते. आतून भांबावलेल्या मनावर फुंकर घालावी लागते आणि पालकांना तुमचे हेतू किती शुद्ध आहेत याची त्यांना ग्वाही द्यावी लागते.त्यांचे मित्र बनण्यासाठी थोडे अधीक कष्ट घ्यावे लागतात.
मुलं अनुकरणातून शिकतात त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागतो आणि तरीही ती चुकू शकतात तेही विनासायास स्वीकारावे लागते. आणि स्वतःत काय बदल करणे आवश्यक आहे हे ही तपासावे लागते. आपणही चुकांतुनच शिकत गेला तेव्हा हा टप्पा आपल्या पाल्यांसाठीही चूकु शकत नाही हे ही स्विकारावे लागते.
शैक्षणिक प्रगती म्हणजे सारे काही नाही पण तरी स्वतः मधले गुण ओळखून योग्य दिशा घेण्यासाठी त्यांच्यामागे घट्ट उभे राहावे लागते. पाल्यातील कुवत त्याची आवड आणि सामाजिक संधीची सांगड घालून त्यांना करियर च्या टप्प्यावर ही मदत्त करावी लागते. पालकांना ह्या काळात स्वतः च्या प्रतिसादावर जवळून अगदी निरखून काम करावे लागते. अतिसंवेदनशील राहून चालत नाही आणि अगदी अंग काढूनही चालत नाही याचा सुवर्णमध्य काढायचा असेल तर त्यांना संवादावर आणि मुलांचा प्रतिसाद मिळेस्तोवर कळ काढावी लागते जनरल विषय चित्रपट गॉसिप यातही रस घ्यावा लागतो. मी काहीही share करू शकतो हा विश्वास मुलाच्या मनात निर्माण झाला की तिढा संपतो. मुलांनाही आपल्या पालकांचा हेतू शुद्ध आहे हे पटल्यावर आणि ते चर्चेस ओपन आहेत समजल्यावर हलके वाटते मला ऐकलं जाणारे हे कळल्यावर तेही लढा थांबवतात आणि मैत्रीची सुरवात होते. आणि सर्वात महत्वाचे जो तो आपला मार्ग शोधायची तो जोखायची आणि योग्य तो धडा आत्मसात करण्यासाठी ह्या पृथ्वीनामक शाळेत आलेला आहे याची खूणगाठ मनात बांधा आपण फक्त catalyst आहोत प्रक्रियाकार नाही तेव्हा आपली भूमिका निभावून बाजुला होण्याची कला अंगिकारायला सुरू करा.
वाचणाऱ्या मुलांनो तुम्ही लक्षात ठेवा पालकही कधी काळी या वयातून गेले आहेत त्यांनी ही स्वतः ला चांगल्या वाइटातून घडवले आहे त्याची इच्छा एकच त्या चुका तुम्ही करू नयेत आणि आयुष्यात तुम्हाला काही कमी पडू नये यासाठी तुम्हीही एक पाऊल मागे घ्यायला हवे त्यांच्या स्वातंत्र्याला आणि मैत्रीला मान देत आणि त्यांच्या प्रेमाला ओळखत स्वतःला लगाम घाला आणि पालकांची शिक्षकांची मदत घेत तुमच्या स्वप्नांचा माग काढायला सुरू करा . चुकलात तरी पहीले त्यांना विश्वासात घ्या दोन फटके खाल पण सर्वात निर्भेळ मदत तेच तुम्हाला करू शकतात.
प्रेमाने गुन्हेगार सुधारू शकतात तर तुमच्याआमच्या घरात संवादाची रोपटी नक्की फुलू शकतात अट एकच मुलांना स्वतंत्र व्यक्तीचा दर्जा द्या ,त्यांना ऐका ,आपल्या कृतीतून त्यांना रोल मॉडेल्स द्या,आपल्या वैयक्तिक असुरक्षितता चिंता भय यांना वेळीच हद्दपार करा आणि सगळ्यात महत्वाचे त्यांचे यश अपयश आपल्या पालकत्वाच्या यशापयशाशी जोडू नका.
प्राची आपटे
ReplyForward |
छान लेख
ReplyDelete