Monday, 1 June 2020

पाउस

पाउस असा कोसळतोय,
काहीतरी सांगू पाहतोय,
मनात दाटलेले सगळे काही जणू 
आज त्याच्याच रूपाने बरसू पाहतय!!!!

खूप दिवस उलटून गेले,
आपण भेटलो, बोललो नाही,
तू आता आयुष्यात नाहीस,
हे मला जाणवलेच नाही????

मनाच्या एका कोपर्यात 
तू सदैव राहशील 
तुझ्यावरचे प्रेम सुद्धा 
अबाधितच राहील,

माणूस खूप स्वार्थी असतो,
सोबत हवी म्हणत म्हणत
एकटाही जगू शकतो.

आपण दोघेही तेच करतोय
प्रेम असूनही एकटे एकटेच जगतोय 
आपले विश्व निर्माण करता करता 
वेगवेगळ्या बेटांवर राहतोय,

पावसाने आज वाट  मोकळी केली 
उगाचच तुझी आठवण करून दिली 
बाहेर जरी ओले चिंब तरी 
मी मात्र कोरडीच राहिले!!!!

Mrunalini 

No comments:

Post a Comment