Friday, 26 June 2020

Local train

ही साधारण 2003 - 2004 ची गोष्ट. मला Cash Dept. ला दुसऱ्यांदा posting होतं तेंव्हाची. तेंव्हा Revised Procedure नुकतीच introduce झाली होती. तिथे साधारण  दोन वाजेपर्यंत काम आटपून आम्ही free व्हायचो. एकदा सहज मनात आलं आणि मी free झाल्यावर  crawford market ला गेले. तिथे गेल्यावर किती गोष्टींचा मोह होतो....मी पण हावरटासारखी खरेदी केली. खूप वजन घेणाऱ्या त्या मोठ्या निळ्या plastic च्या पिशव्या आसायच्या नं त्या दोन्ही गच्च भरल्या. वाटलं की भुर्रकन taxi पकडून V.T. ला जाऊ. गाडी पकडून डोंबिवली...पुढे रिक्शा ने घरी. पण जवळच्या अंतरावर यायला एकही टॕक्सीवाला तयार होईना. मग काय चालायला सुरवात केली. मागच्या bridge वरून स्टेशनात शिरले.

बारा डब्यांची semi fast लोकल उभी होती. सुटायला बराच वेळ होत्या. एवढे कष्ट केल्यावर window seat तर मिळायलाच पाहिजे. साडी नेसले होते. ती वर खोचलेली, पदर खोचलेला, हातात दोन जड पिशव्या असा घामाघूम झालेला अवतार होता. कल्याण end च्या first च्या डब्यात डोकावले. एकही Window seat  रिकामी नव्हती. दुसऱ्या बाजूने उतरले. मधल्या डब्याकडे चालू लागले. लेडीज डब्यातल्या बायकांनी शुकशुक केलं. पण मला काहीच कळलं नाही. मधल्या डब्यातही हवी तशी जागा नाही. पुन्हा दुसऱ्या बाजूने उतरून पहिल्या डब्याकडे गेले. काॕलेजच्या पोरींनी तो डबा भरलेला....तेवढ्यात मला दोन तीन बायकांनी विचारलं की काय, काय  विकायला आणलंय....मी चाटच झाले....अर्थात तोपर्यंत माझं सोंगही तसंच झालं असणार....परत त्या़ंनी हे पण बजावलं की हा फर्स्ट क्लासचा डबा आहे! म्हटलं आता इथे तर नाहीच थांबायचं...चला उलटं मधल्या डब्याकडे...चालत असताना एक विक्रेती बाई आली नि म्हणाली की हा आमचा time आहे. यावेळी शानपट्टी करायची नाही. काही इकायला यायाचं नाही...माझं ततपप झालं. मधल्या डब्यात शिरले नि गाडी सुटली...पुन्हा हीच भिती की बायका सांगतील की तुमचा डबा हा नाही. पुढच्या स्टेशन ला उतरा. मी बाहेरच उभी होते.

तेवढ्यात आतून दणदणीत आवाज आला की आत ये गं ....जागा आहे....माझ्या मैत्रिणीला बघितलं आणि  माझ्या जिवात जीव आला....

 Manjusha Datar

No comments:

Post a Comment