दिशांच्या गर्भातली
तुमच्या माझ्या मनातली,
दृष्य- अदृष्य
घोंगावती वादळे.
भुगर्भाला भेदिती
दिशांची वादळे,
झुंजती स्वतःशी
मन-अंतर्मनाची वादळे.
उडालेल्या फोफाट्यातूनी
वाट आशेची दिसे
दुभंगलेल्या भावनांना
किनारे लाभती कसे?
थांग लाव स्वतःचं तू
मनातील वादळांचा,
तुझाच घे शोध तू
विखुरलेल्या भावनांचा.
पानगळ जाहली जरी
सोसुनी वादळवारा,
घे आकाश भरारी
शोधण्या नव्या दिशा.
तटस्थ होऊनि पहावा
कल्लोळ भावनांचा,
काळोखाच्या गर्देतही
शोध घ्यावा सुखांचा.
ना थांबतील भावना
शमतील ना ही वादळे,
जीवनाचे सोबती हे
असती बंध आगळे.
दृश्य -अदृश्य
घोंगावती वादळे,
दिशांच्या गर्भातली
तुमच्या -माझ्या अंतर्मनातली!
सौ. सुगंधा पंकज रागळवार
जर्मनी
No comments:
Post a Comment